Murder Video

Murder Video : क्रुरतेचा कळस! जमिनीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर घालून तरुणाची निर्घृणपणे हत्या

4900 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भारतपूर जिल्ह्यातील बयाना तालुक्यात एक धक्कादायक (Murder Video) घटना घडली आहे. यामध्ये जमीनीच्या वादातून एका तरुणाच्या अंगावरुन 8 वेळेस ट्रॅक्टर फिरवून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नरपत गुज्जर (वय 35) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेतकऱ्यांच्या दोन गटात वाद सुरु असताना नरपत गुज्जर जमीनीवर कोसळला. यानंतर आरोपींनी अनेकदा त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर फिरवला. आरोपींनी ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून त्याचा खून केला. या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानमधील अड्डा येथे बहादूर गुर्जर आणि अतार सिंग गुर्जर यांच्या कुटुंबात वाद सुरु होता. बुधवारी (दि.25) सकाळी दोन्ही कुटुंबीयांनी दगड आणि काठ्या घेत एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये महिलांही सहभागी होत्या. या वाद सुरु असतानाच अतार सिंग यांचा मुलगा जमीनीवर कोसळला यानंतर आरोपींनी त्याच्या अंगावरून 8 वेळा ट्रॅक्टर फिरवला.

“शेतकऱ्यांच्या दोन गटात वाद सुरु होता. या वादातूनच ही अमानुष घटना घडली. या प्रकरणी घटनास्थळावरुन 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय या वादात 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर बयाना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.” अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!