Satara News

Satara News : दुचाकीवरून जात असताना माजी सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू

3030 0

सातारा : सातारा (Satara News) जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. यामध्ये एका माजी सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सातारा – लातूर राष्ट्रीय महामार्गावर गोळेवाडी फाट्याजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. माजी सरपंचाच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येणार्‍या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

अभय रामचंद्र मेनकुदळे (वय 53, रा. शिखरशिंगणापूर, ता. माण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते माजी सरपंच आहेत. या अपघातात सोपान शामराव राऊत हे जखमी झाले आहेत. सेवानिवृत्त पोलीस हवालदार सोपान शामराव राऊत व अभय रामचंद्र मेनकुदळे हे दोघे दुचाकीवरून शिखरशिंगणापूरहून सातार्‍याकडे काही कामानिमित्त निघाले होते. दुपारी वाजण्याच्या सुमारास ते गोळेवाडी फाट्याजवळ आले होते. त्यांच्या दुचाकीचा वेग अत्यंत कमी होता, त्याचदरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती कि, या धडकेने दोघे जण खाली पडले. यावेळी धडक देणारी दुचाकी निघून गेली. मात्र, पाठीमागून आलेल्या तिसर्‍या दुचाकीचे पुढचे चाक डोक्यावरून गेल्याने अभय मेनकुदळे यांचा जागीच मृत्यू झाला तर तर सोपान राऊत हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अभय मेनकुदळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. माजी सरपंचांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!