Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! मोबाईल दिला नाही म्हणून मुलानं आपल्या जन्मदात्या आईला दिली ‘ही’ शिक्षा

1880 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून निर्दयी मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला पण गळ्यावरील जखमांमुळे आरोपीचे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. रामनाथ बडबाईक असं आरोपी मुलाचे नाव आहे तर कमलाबाई बडबाईक असे हत्या झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. शवविच्छेदन अहवालात कमलाबाई बडबाईक यांच्या गळ्यावर जखमा आढळून आल्यानं त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शुल्लक कारणातून केली हत्या
आरोपी मुलाला दारूचे व्यसन होते. तो दारू पिण्यासाठी आपल्या आईकडे सतत पैशांची मागणी करायचा. त्याने दारूचे व्यसन भागविण्यासाठी आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने आपल्या आईची निर्घृणपणे हत्या केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!