Baramati Plane Crash

Baramati Plane Crash : बारामतीत प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं

748 0

बारामती : बारामती तालुक्यातील कटफल या ठिकाणी एक शिकाऊ विमान कोसळल्याची (Baramati Plane Crash) घटना घडली आहे. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पायलट शक्ती सिंग यांना किरकोळ दुखापत झाली आहे. बारामतीत पायलटना ट्रेनिंग दिलं जाते. यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
कटफल इथे वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. अनेक पायलट इथे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊन तयार होतात. गेल्या काही दिवसापासून इथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुणे आणि शेजारील जिल्ह्यातही या विमानांच्या घिरट्या पाहायला मिळतात. आजही असंच ट्रेनिंग सुरु होतं. या ट्रेनिंगदरम्यान कटफलमध्ये विमान कोसळलं. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले आहेत. सुदैवाने ही दुखापत गंभीर नाही आहे.

Share This News
error: Content is protected !!