Sherika De Armas

Sherika De Armas : माजी मिल वर्ल्ड स्पर्धक शेरिका डी अरमासचे निधन

1597 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक शेरिका डी अरमासचे (Sherika De Armas) निधन झाले आहे. तिने 2015 मध्ये ‘मिस वर्ल्ड’ या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत उरुग्वेचं प्रतिनिधित्व केलं होतं. शेरिकाची सर्वाइकल कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. 13 ऑक्टोबर रोजी तिचं निधन झालं. शेरिकाने कॅन्सरसाठी किमोथेरपी आणि रेडियोथेरपीसुद्धा घेतली होती. तिच्या या मृत्यूवर जगभरातून सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.

26 वर्षीय शेरिकाने 2015 मध्ये चीनमध्ये आयोजित करण्यात आलल्या ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ती टॉप 30 स्पर्धकांमध्ये पोहोचू शकली नव्हती. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत शेरिका म्हणाली होती, “मला नेहमीच मॉडेल बनायचं होतं. मग ते ब्युटी मॉडेल असो किंवा जाहिरातीसाठी मॉडेल किंवा कॅटवॉक मॉडेल. फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते. ही स्पर्धा खूप आव्हानात्मक आहे, मात्र त्यात सहभागी झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे.”

शेरिकाने तिचा मेकअप ब्रँडसुद्धा लाँच केला होता. शे डी अरमास स्टुडिओ या नावाने ती केस आणि पर्सनल केअरशी संबंधित प्रॉडक्ट्स विकायची. याशिवाय कॅन्सर पीडित मुलांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या फाऊंडेशनसाठीही ती काम करत होती.

Share This News
error: Content is protected !!