Bhandara Accident

Bhandara Accident : भंडाऱ्यामध्ये कार आणि बसचा भीषण अपघात

514 0

भंडारा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. भंडाऱ्यामध्ये (Bhandara Accident) कार आणि बसचा असाच भीषण अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांची सामोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. साकोलीकडून लाखनीकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाला तुमसरकडे जाणाऱ्या बसची समोरासमोर धडक बसली. ही घटना भंडारा जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील कीन्ही या ठिकाणी घडली आहे.

या अपघातात बस मधील 26 प्रवासी सुखरूपपणे बचावले असून चारचाकी वाहनातील दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भंडारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!