मुंबई : फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या व नंतर क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या.
राज्य सरकारनं आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची व नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते. त्यांनी आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानं त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला या 1988 च्या बॅचच्या अधिकारी आहेत.