मुंबई : पंजाबची कतरिना कैफ अशी ओळख असणारी अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) नेहमी चर्चेत असते. शहनाजला खरी ओळख ही ‘बिग बॉस 13’ मधून मिळाली. त्यानंतर शहनाज गिलनं बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोत काम केलं. सध्या शहनाजही तिचा आगामी चित्रपट ‘थॅंक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सध्या शहनाज चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान शहनाजने अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. नुकतेच तिने दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये रहायचं असेल तर काय करावं लागतं याविषयी वक्तव्य केले आहे.
काय म्हणाली शहनाज गिल ?
बॉलिवूडमध्ये स्वत: स्थान कायम ठेवायचे असेल तर बॉडीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शहनाज म्हणाली की ‘जर मी इथे काम करत नसते, तर मी तिच लठ्ठ शहनाज गिल असते. पण बॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमची बॉडी मेनटेन ठेवावी लागते. मला काही दिवासांपूर्वीच एका व्यक्तीनं लठ्ठ शहनाज गिल म्हणून भूमिका ऑफर केली होती. तर मी त्यांच्यासमोर हाथ जोडले आणि मी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्याकडून काहीही करून घ्या, पण मला आता परत लठ्ठ होण्यास नका सांगू. मला माहितीये की मी किती मेहनत करत माझा लठ्ठपणा घालवला आहे. आता माझ्याकडून हे होणार नाही.’ तसेच ती पुढे म्हणाली जे लोक या चित्रपटसृष्टीत नाही ते खूप चांगलं आयुष्य जगत आहेत. त्यामुळे अशा आयुष्याचा काय फायदा, कारण इथे आपण जे पाहिजे ते खाऊपण शकत नाही. यापेक्षा मी मरणं पसंत करेन. लठ्ठ किंवा बारीक शरीरयष्टी असं काहीही नसतं. तुमच्यात आत्मविश्वास असणं गरजेचं आहे.
शहनाजच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ‘थॅंक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटात ती दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री भूमि पेडनेकर, कुशा कपिला आणि डॉली सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे करण भूलानी यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही शोभा कपूर, अनिल कपूर, एकता कपूर आणि रिया कपूर यांनी केली आहे.