Jalna News

Jalna News : जालना हादरलं ! SRPF जवानाने स्वत:वरच गोळी झाडून आयुष्याचा केला शेवट

3061 0

जालना : जालनामध्ये (Jalna News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका SRPF जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सचिन भदरगे असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. राज्यराखीव पोलीस दलाच्या शस्त्रागारातच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आपल्या आयुष्य संपवलं आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय घडले नेमके ?
सचिन गोविंद भदरगे (वय 41 वर्षे) हे पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. शस्त्रागारात ते ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला सहकारी जवान शस्त्रागाराच्या बाहेर असतानाच गोळी झाडल्याचा आवाज आला. सहकारी जवानाने आत जाऊन पाहिलं असता सचिन भदरगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

सचिन भदरगे यांच्या आत्महत्येमुळे राज्य राखीव दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच SRPF चे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!