Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं ! कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video आला समोर

956 0

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. या ठिकाणी कोयता गँगची सध्या दहशत आहे. यापूर्वी शहराच्या विविध भागात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न कोयता गँगकडून करण्यात आला होता. मात्र आता या गॅंगने एकाची हत्या केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
चिंचवड येथील लाईनबॉय आणि व्यावसायिक विजय ढुमे यांची सिंहगड रोड येथील क्वॉलिटी लॉजसमोर चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे.विजय ढुमे यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हेगारांसोबत संबंध होते. या हत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. सध्या याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. विजय ढुमे हे एका लॉजमधून खाली उतरत होते. लॉजमधून खाली उतरताच त्यांच्यावर चार ते पाच जणाच्या टोळक्यानं आपल्या हातातील कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!