Chandrayaan 3 : जब तक सुरज चांद रहेगा; तब तक चांद्रयान 3….; ISRO ची मोठी घोषणा
भारताची चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम पूर्ण झाली असून, यशस्वी ठरली आहे.विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. सध्या दोघेही डिअॅक्टिव्ह म्हणजेच झोपेत आहेत. पुढील रात्र होईपर्यंत त्यांना जागं करण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे. जर दोघांना जाग आली तर उत्तम, अन्यथा कोणतंही नुकसान होणार नाही. त्यामुळे आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही असं इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ म्हणाले आहेत.
काय म्हणाले डॉ. एस सोमनाथ?
प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला जे काम देण्यात आलं हे, ते आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे जर आता ते झोपेतून जागे झाले नाहीत तरी वाईट वाटण्याचं काही कारण नाही. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी ठरली आहे. जर रोव्हर आणि लँडरचे सर्किट डॅमेज झाले नसतील तर प्रज्ञान आणि विक्रमला पुन्हा जागं करण्यात आलं असतं. कारण शिवशक्ती पॉईंटवर तापमान उणे 200 डिग्री सेल्सिअसच्या खाली पोहोचलं आहे. तसं तर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत चांद्रयान 3 चंद्रावर उपस्थित राहणार आहे असे ते म्हणाले.
इस्रोच्या प्रमुखांनी आता प्रज्ञान आणि विक्रम जागे झाले नाहीत तर काही अडचण नाही असं म्हटलं आहे. लँडर रोव्हर आणि प्रज्ञान रोव्हरला जी जबाबदारी देण्यात आली होती, ती दोघांनी पूर्ण केली आहे. दोघांना पुन्हा जागं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील रात्र होईपर्यंत त्यांना जागं करण्याचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. मात्र तिकडून कोणताही रिस्पॉन्स येताना दिसत नाही आहे. ISRO लवकरच आपल्या पुढील मोहिमेची घोषणा करणार आहे.
