Nashik Ganesh Visarjan

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; 2 जण बुडाले

2971 0

नाशिक : अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला नाशिक जिल्ह्यातील (Nashik Ganesh Visarjan) निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी एक तरुण बुडाल्याची घटना ताजी असताना आता आज नाशिक मधील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये गोदावरी नदीत दोन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जवळपास 22 हुन अधिक मंडळ या मिरवणुकीत सहभागी झालेली आहेत. अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. शहरातील रामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन गणेश भक्त बुडाले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीत टेम्पोने 2 जणांना चिरडलं
देशभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपती विसर्जनाच्या मिरवणूका पार पडत आहेत. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये रत्नागिरीमधील गुहागरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. गणेश विसर्जन मिरवणुक सुरु असताना अचानक ब्रेक फेल झालेला टेम्पो गर्दीमध्ये घुसला. या दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 गणेशभक्त जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुहागरमधील पाचेरी आगर येथे गणेश विसर्जन दरम्यान मिरवणुकीत ही दुर्घटना घडली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!