यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) गणपती विसर्जनादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. काल सगळीकडे अंनत चतुर्दर्शी निमित्त गणेशभक्त जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते. यादरम्यान सगळीकडे जल्लोषाचे वातावरण असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
यवतमाळच्या दारवा तालुक्यातील बोरी खुर्द येथे ही घटना घडली असून हितेश पाचबुदे असं जीव गमावलेल्या युवकाचं नाव आहे. हितेश अडाण नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेला होता दरम्यान अचानक त्याचा तोल जाऊन तो अडाण नदीच्या पात्रात बुडाला. दरम्यान तेथील नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.