Pune News

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! गणेशोत्सवात हे प्रमुख रस्ते संध्याकाळी राहणार बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

355 0

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवात आज, शनिवारपासून गणपतीचे दर्शन (Pune News) आणि देखावे पाहण्यासाठी गर्दी होण्याच्या शक्यतेने शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता; तसेच अंतर्गत रस्ते आजपासून सायंकाळनंतर बंद केले जाणार असल्याने नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 23 ते 27 सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाच ते गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असणार आहेत.

कोणते रस्ते राहणार बंद आणि त्यासाठी पर्यायी रस्ते
बंद रस्ता : लक्ष्मी रोड : हमजेखान चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग : डुल्या मारुती चौकातून दारूवाला पूल मार्गे, हमजेखान चौकातून शंकरशेठ रस्ता मार्गे तसेच सोन्यामारुती चौकातून मिर्जा गालीब रस्त्याने मंडईमार्गे स्वारगेट

बंद रस्ता : शिवाजी रोड : गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
पर्यायी मार्ग : शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाण्यासाठी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता किंवा टिंबर मार्केट मार्गे स्वारगेट

बंद रस्ता : बाजीराव रोड : पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक
पर्यायी मार्ग : टिळक रस्ता, टिळक चौक, केळकर रस्ता

बंद रस्ता : टिळक रोड : मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक
पर्यायी मार्ग : जेधे चौक, नेहरू स्टेडियम

बंद रस्ता : घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण व हिराबाग चौक
पर्यायी मार्ग : शिंदे आळी, भिकारदास पोलिस चौकी, खजिना विहीर मार्गे टिळक रस्ता

वाहने लावण्यास बंदी
शिवाजी रस्त्यावर जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या दरम्यान वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide