heavy Rain

Maharashtra Rain : आजपासून राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

474 0

राज्याच्या बहुतांश भागात पावसानं (Maharashtra Rain) दडी मारली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, शेतकऱ्यांना सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. कारण जर हा पाऊस पडला नाहीतर खरीपाची पिकं वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. आज राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उद्यापर्यंत म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक ते कोल्हापूर पर्यंतच्या पाच जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!