Washim news

Washim News : कर्तव्यावर असताना काळाचा घाला; वाशिमच्या जवानाला लेहमध्ये वीरमरण

540 0

वाशीम : वाशीम जिल्ह्यातील (Washim News) सुपुत्राला काश्मीरमधील लेहमध्ये वीरमरण आलं आहे. आकाश आढागळे असे वीर जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरपूर गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

कर्तव्यावर असताना घडली दुर्घटना
आकाश आढागळे गेल्या अकरा वर्षांपासून भारताच्या इंडियन आर्मीमध्ये कार्यरत होते. 8 सप्टेंबर 2023 रोजी कर्तव्यावर असताना एका दुर्घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले होते. सैन्यदलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल 10 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली आढागळे, 4 वर्षांची तन्वी नावाची मुलगी, आई विमलबाई आढागळे आणि दोन भाऊ नितीन आढागळे आणि उमेश अडागळे असा परिवार आहे.

आकाश यांचे दोन्ही बंधू देखील देशसेवेत
शहीद आकाश यांचे मोठे भाऊ नितीन सीमा सुरक्षा बल सध्या कार्यरत आहेत. धाकटे बंधू उमेश हे महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये कार्यरत आहेत. तीनही भावंड देश सेवेमध्ये कार्यरत आहेत.

उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उद्या म्हणजेच 12 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी शिरपूर इथे आणले जाणार आहे. तिथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!