Ratnagiri News

Ratnagiri News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

837 0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) देवरुख येथील सप्तलिंगी नदीत दोन सख्खे भाऊ बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये (Ratnagiri News) एका भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतलेला दुसरा भाऊही बुडाला आहे. यातील गणेश उर्फ सागर रामचंद्र झेपले (वय 37 वर्षे) याचा मृतदेह मिळाला आहे. तर भाऊ सचिन झेपले याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. त्याला शोधण्याचं काम सप्तलिंगी नदी परिसरात युद्ध पातळीवर सुरू आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ही धक्कादायक घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घडली आहे. गणेशचा भाऊ सचिन झेपले आणि त्याची पत्नी योगिता, मुलगी आकांक्षा हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुर गावातील सप्तलिंगी नदीवर चिरेकोंड या ठिकाणी कपडे धुण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर सचिन उर्फ बाल्या रामचंद्र झेपले हा नदीच्या बंधाऱ्यावर जावून सायंकाळच्या सुमारास आंघोळ करीत असताना त्याचा पाय घसरुन तो डोहात बुडाला.

हि गोष्ट त्याची पत्नी योगिता यांच्या लक्षात येताच त्यांनी दीर गणेश उर्फ सागर रामचंद्र झेपले याला येवून सांगितले. आपला भाऊ नदीत बुडाल्याचं कळताच गणेशही नदीकडे धावत गेला आणि त्याने भावाला वाचवण्यासाठी थेट नदीत उडी घेतली. पाठोपाठ योगिता सचिन झेपले या देखील गेल्या. त्यानंतर त्यांना दीर गणेश आणि तिचा पती नदीच्या पाण्यात दिसले नाहीत. तोवर अन्य लोकही या ठिकाणी जमा झाले होते. वाडीतील लोकांनी तात्काळ नदी किनारी शोध मोहीम सुरू केली. तेव्हा गणेश उर्फ सागर रामचंद्र झेपले हा सापडला. त्याला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात देवरुखला आणण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या सगळ्या दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकाराने देवरुख पूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोन्ही भाऊ मोलमजुरी आणि किरकोळ कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.

Share This News
error: Content is protected !!