David Warner

David Warner : वॉर्नरने मोडला सचिनचा ‘तो’ विक्रम; 6 हजार धावांचा टप्पादेखील केला पार

565 0

सिडनी : सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) एक मोठा विक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. मात्र डेव्हिड वॉर्नरने सचिनचा शतकांचा एक विक्रम मोडला आहे. डेव्हिड वॉर्नरने सचिन तेंडुलकरला मागे टाकत सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके केली आहेत.

सचिनने सलामीवीर म्हणून खेळताना 45 शतके केली होती. विषेश म्हणजे सचिनने ही सर्व शतके एकदिवसीय क्रिकेटमध्येच केली आहेत. तर डेव्हिड वॉर्नरने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ही आकडेवारी मागे टाकली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने सलामीला 42 शतके केली आहेत. तसेच वॉर्नरने सलामीला खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पादेखील पार केला आहे.

वॉर्नरने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वॉर्नरने त्याची सर्व शतकं ही सलामीवीर म्हणूनच केली आहेत. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांमध्ये डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नावावर 76 शतके आहेत.

Share This News
error: Content is protected !!