रघुनाथ कुचिक प्रकरणात पीडितेची पूजा चव्हाण होऊ देऊ नका – चित्रा वाघ

275 0

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासन व पोलिस या प्रकरणात कोणतीही गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा व नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या यावेळी संबंधित पीडितेची पूजा चव्हाण होऊ देऊ नका. असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या .

संबंधित प्रकरणात आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांची आपण भेट घेतली असून या मुलीचं लोकेशन पणजी असे दाखवत आहे आणि ज्या वेळी मी या मुलीशी संपर्क साधला होता त्या वेळी तिने मला गोव्यात सुरक्षित वाटत नाही असं सांगितलं होतं मात्र असा असताना देखील त्या मुलीचं लोकेशन पणजी कसं असा सवाल देखील चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Share This News
error: Content is protected !!