……पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना रद्द

126 0

पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली होती. यानुसार १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर देखील करण्यात आली होती.

मात्र आता प्रभागरचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.ओबीसी आरक्षण निश्चित करण्याचा प्रश्न लांबला आहे. राज्य सरकारने नुकताच अध्यादेश काढून मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे पुण्यासह चौदा महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचनाही रद्द करण्यात आली आहे, तसा आदेश नुकताच पालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारला निवडणुका, आरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेचे नियोजन करण्याचे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना रद्द केली आहे. तसा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला.

Share This News

Related Post

Parbhani Brother

आईवडिलांच्या आत्महत्येनंतर मोठ्या भावाच्या जिद्दीमुळे 3 भाऊ झाले पोलीस

Posted by - May 26, 2023 0
परभणी : परिस्थिती आपल्याला कधी काय करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना 4भावांच्या बाबतीत घडली. यामध्ये…

#CHANDRAKANT PATIL : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद

Posted by - March 10, 2023 0
मुंबई : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल २२ वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची…

राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; यावेळी चार खाती महिला आमदारांकडे ? चित्रा वाघ म्हणाल्या…

Posted by - December 16, 2022 0
पुणे : आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. परंतु तो पुढे ढकलण्यात आला, राज्याला आता…
Arrest

पुणे रेल्वे स्थानकावर बॉंब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना अटक

Posted by - May 5, 2022 0
पुणे – नियंत्रण कक्षाला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉंब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *