Breaking News
Jasmin Bhasin

Jasmin Bhasin : बिग बॉस फेम जस्मिन भसीनने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा; चाहत्यांमध्ये खळबळ

2238 0

छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री जस्मिन भसीनला (Jasmin Bhasin) बिग बॉस मधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तिचं सोशल मीडियावर चांगलंच फॅन फॉलोईंग आहे. तर तिला याच शो मधून तिचा लाईफ पार्टनर देखील मिळाला. सध्या ही अभिनेत्री अनेक हिट गाण्यांमध्ये झळकत आहे. पण जास्मिनने नुकत्याच केलेल्या एका खुलास्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

काय केला खुलासा?
‘बिग बॉस’ फेम जस्मिन भसीन अलीकडेच बॉयफ्रेंड अली गोनीसोबत थायलंड ट्रिपवरून परतली आहे. याशिवाय, तिच्या अलीकडच्या गाण्यांसाठीही त्याला खूप प्रशंसा मिळत आहे. दरम्यान, जास्मिन भसीनने खुलासा केला की, तिचा सावळा रंग, अलीसोबतचे नाते आणि इतर अनेक कारणांमुळे तिला दररोज ट्रोल केले जाते. एवढंच नाही तर काही ट्रोलर्स तिला बलात्काराच्या धमक्याही देतात. तिच्या या खुलास्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

तसेच ती पुढे म्हणाली “बिग बॉस 14 नंतर मला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मला दररोज अश्लील कमेंट्स करून ट्रोल केलं जायचं. हे ट्रोलिंग जेव्हा मर्यादेपलीकडे गेलं तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले.’मला अनेक चांगले – वाईट अनुभव आले आहेत. एक वेळ अशी आली की मला माझ्या भविष्याबद्दल खूप काळजी वाटायला लागली. या सर्व कारणांमुळे मी आयुष्यात पहिल्यांदाच डिप्रेशनमध्ये गेले. हे लोक मला बलात्काराच्या धमक्या देत होते. ते मला अशा घाणेरड्या नावांनी हाक मारायचे जे मी याआधी कधी ऐकलेही नव्हते.’’ असा खुलासा तिने केला आहे.

Share This News
error: Content is protected !!