Akola News

Akola Crime : संपत्तीच्या वादातून काका-काकूकडून पुतण्याची हत्या

5589 0

अकोला : संपत्तीच्या वादातून कुटुंबातील एकाची हत्या केल्याची घटना अकोल्यातील (Akola Crime) पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द याठिकाणी घडली आहे. मिलिंद तुळशीराम इंगळे (वय 36) असे मृत व्यक्तिचं नाव आहे. दरम्यान, संपत्तीच्या वादातून मृतकाच्या काका अन् काकूने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मिलिंदची आत्महत्या वाटावी यासाठी गळफास घेतलेल्या अवस्थेत टांगले. इतकेचं नव्हे तर त्याची पत्नी पोहचेपर्यंत अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू केली.

मृतकाची पत्नी गावात परतल्यानंतर तिला संशय आला. त्यामुळे तिने पातूर पोलिसांना सोबत घेऊन गाव गाठले. परंतु, ती गावात पोहोचण्याच्याआधीच मृतकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंब आणि गावकऱ्यांनी केली. दरम्यान, अंत्यसंस्काराच्या वेळेवर बुधवारी सायंकाळी मृतकाची पत्नी पोलिसांना घेऊन पोहोचल्याने अंत्यसंस्कार थांबवण्यात आला.

पातुर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. आता वैद्यकीय अहवालानंतर मिलिंद इंगळे यांनी आत्महत्या केली नसून त्यांना मारहाण करून गळा आवळून त्यांची हत्या केली अन् गळफासावर लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केला असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काका काकुंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!