Nagpur Accident

Nagpur Accident : समृद्धी महामार्गावर डॉक्टर मायलेकाच्या गाडीचा भीषण अपघात; आईचा दुर्दैवी अंत, तर मुलाची तब्येत चिंताजनक

35972 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरून जात असताना डॉक्टर मायलेकाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात आईचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. डॉ. नूतन बेदी (60, जोधपूर, राजस्थान) असे मृत आईचे नाव आहे तर डॉ. गौतम बेदी (25) असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी मुलावर सावंगी तहसील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.हे दोघेजण नागपूरहून वर्ध्याला जात असताना हा अपघात घडला.

काय घडले नेमके?
डॉ. नूतन या त्यांचा मुलगा गौतमसोबत आरोग्य विभागाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर डॉक्टर आई आणि मुलगा समृद्धी महामार्गाने वर्ध्याला जाण्यासाठी आपल्या कारने निघाले. केळझरजवळील केळकेली आऊटरवरून उतरताना गौतमचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार डिव्हायडरला धडकली. यानंतर कारने तीन-चार वेळा पलटी खाल्ली. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये कारचा चुराडा झाला आहे. तसेच या अपघातात डॉ. नूतन बेदी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गौतम बेदी हा गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आणि सेलू पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी डॉ. गौतम यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच डॉ. नूतन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!