Honey Trap

Honey Trap : हनी ट्रॅपिंग प्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून मुबंईतील मॉडेलला अटक

738 0

बंगळुरू: कर्नाटक पोलिसांनी मुंबईस्थित मॉडेलला अटक केली आहे. हनी ट्रॅपिंग (Honey Trap) प्रकरणात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सावज हेरुन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून, त्यांना इस्लाम कबूल करण्याची धमकी देऊन मॉडेल आणि तिची टोळी लोकांकडून लाखो रुपये उकळायची. या प्रकरणी पुत्तेनहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा उर्फ मेहर असे आरोपी मॉडेलचं नाव आहे.

नेहा उर्फ मेहर टेलिग्रामच्या माध्यमातून बंगळुरुमधील 20 ते 50 वर्ष वयोगटातील लोकांच्या संपर्कात आली. तिनं तिच्या जेपी नगर फेज 5 मधील घरी शरीरसंबंध ठेवण्याचं आमिष दाखवलं. अनेक जण तिच्या जाळ्यात अडकले. बरेच जण तिच्या घरी जायचे. ती मोठ्या चलाखीनं नाजूक क्षण कॅमेऱ्यात गुपचूप कैद करायची आणि त्यानंतर ती त्यांना ब्लॅकमेल करायची. नेहाचं खरं नाव मेहर आहे. तिनं नेहा नावानं सोशल मीडिया अकाऊंट्स तयार केली आहेत. या अकाऊंट्सवरुन तिनं तिच्या मॉडेलिंगचे फोटो शेअर केले आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची. कमी वयाच्या तरुणांना हेरुन ती त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवयाची.

यानंतर रिक्वेस्ट ऍक्सेप्ट झाल्यावर ती त्यांच्याशी चॅटिंग सुरु करायची. या माध्यमातून ती तरुणांशी जवळीक साधायची. अतिशय मोकळेपणानं बोलायची. सेक्स चॅट करायची. त्यानंतर तरुणांना घरी बोलवायची. तिच्या जाळ्यात फसलेले तरुण तिच्या घरी यायचे. नेहानं बंगळुरुत एक फ्लॅट भाड्यानं घेतला होता. तरुण नेहाच्या जाळ्यात अडकून तिच्या घरापर्यंत पोहोचायचे. इथे ती बिकनी घालून त्यांचं घरात स्वागत करायची. तरुणांना आलिंगन द्यायची. त्यांचं चुंबन घ्यायची. यावेळी फ्लॅटमध्ये लपलेले तिचे साथीदार या नाजूक क्षणांचे व्हिडीओ काढायचे. व्हिडीओ काढून होताच ते अचानक समोर यायचे आणि या तरुणांना धमकावत होते.

यानंतर नेहाचे साथीदार पीडित तरुणांकडून त्यांच्या मोबाईलचं लॉक उघडून घ्यायचे. त्याच्या मोबाईलमधील सगळे कॉन्टॅक्ट नंबर स्वत:च्या मोबाईलमध्ये घ्यायचे. आता तुला इस्लाम कबूल करावा लागेल. खतना करावा लागेल. नेहासोबत निकाह करावा लागेल. अन्यथा नेहासोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ तुझ्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना पाठवेन अशी धमकी द्यायचे. घाबरलेले तरुण पैसे द्यायला तयार व्हायचे. अशा प्रकारे नेहा आणि तिच्या साथीदारांनी पीडित लोकांकडून लाखों रुपये उकळले. बदनामीच्या भीतीने पीडित पोलीस तक्रार करायचे नाहीत. मात्र एका अभियंत्याने हिंमत करून तिची पोलीस तक्रार केली. तरीदेखील नेहा ब्लॅकमेल करत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर हनी ट्रॅपिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मॉडेलसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!