Satara News

Satara News : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर 2 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

1978 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सगळीकडे स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना साताऱ्यामधून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. फलटण येथील श्रीराम एज्युकेशन संस्थेच्या विरोधात हिम्मतराव खरात यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे सातारा नगर पालिकेच्या विरोधात जयवंत कांबळे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात (Satara News) मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या तरुणांना ताब्यत घेतले आहे. अग्निशमन बंबाच्या साहाय्याने पाणी मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना देखील दोन जणांनी अंगावर घेतलं रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!