Nagpur News

Nagpur News : टीव्हीवर कार्टून पाहत असताना मोठा अनर्थ घडला अन् चिमुकल्याने जागीच जीव सोडला

994 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात सेट टॉप बॉक्सला हात लागल्यामुळे विजेचा शॉक लागून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना (Nagpur News) मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरी पन्नासे या ठिकाणी घडली आहे. प्रियांशू ज्ञानेश्वर चवरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मृत प्रियांशूचे वडील शेतकरी आहेत.

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ज्ञानेश्वर चवरे (वय 25) हे शेतात गेले होते. काम आटोपून घरी आले व झोपले. यादरम्यान प्रियांशूची आई व आजी शेतात गेले. 4 वर्षीय प्रियांशू हा घरात खेळत होता. खेळत असताना तो टीव्हीवर कार्टून पाहत होता. तसंच टीव्हीच्या सेट टॉप बॉक्स वायरने ओढत होता. यादरम्यान अचानक प्रियांशूला विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला.

प्रियांशूचे वडील ज्ञानेश्वर चवरे यांनी मुलगा बेशुद्ध झाल्याचं पाहताच त्याला तातडीने हिंगणा येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मंगळवारी हिंगणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिमुकल्या प्रियांशूच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!