shailaja darade

Shailaja Darade : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या शैलजा दराडे यांना पुणे पोलिसांकडून अटक

913 0

पुणे : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर (Shailaja Darade) करण्यात आला आहे.शैलजा दराडे या शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना 2019 साली त्यांनी राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 लाख ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्यासह त्यांच्या भावावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डी .एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 लाख तर बी. एड. झालेल्या शिक्षकांकडून 14 लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शिक्षक पोपट सूर्यवंशी यांनी याबाबत पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Share This News
error: Content is protected !!