Nashik News

Nashik News : हृदयद्रावक ! कुटुंबावर दुहेरी संकट, मायलेकीचा शॉक लागून मृत्यू तर मुलगा रस्ते अपघातात जखमी

770 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील (Nashik News) ओझर परिसरात मायलेकीचा मृत्यू झाल्याची एक दुर्देवी घटना समोर आली आहे.आकांक्षा रणशूर असे मृत पावलेल्या मुलीचे तर मीना सोनवणे आईचे नाव आहे. रविवार असल्याने आकांक्षा, आई मीना आणि दोन मुलांसह घराजवळ असलेल्या झाडावरचे पेरु तोडण्यासाठी गेले होते. यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
आकांक्षा रणशूर हिचं सासर नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) निफाड आणि माहेर ओझर इथं आहे. अधिक मास असल्याने आकांक्षाच्या आईने मुलगी, जावई आणि नातवंडांना रणशूर परिवाराला जेवणासाठी बोलावले होतं. यासाठी रणशूर परिवार शनिवारी ओझरला पोहोचले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आकांक्षा, आई मीना, दोन मुलं आणि पतीसह घराच्या गच्चीवर गेले. घराजवळच पेरूचे झाड होतं. नातवंडाना पेरू खाऊ घालण्यांसाठी आजी आणि आई झाडाजवळ गेले. त्यांच्यासोबत दोघ नातू सुद्धा गेले. मात्र पेरू तोडत असताना हातात असलेला लोखंडी रॉड हा घराजवळून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना लागला. यात मीना आणि आकांक्षा या मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तर जावई आणि दोन नातवंडे शॉकमुळे लांब फेकले गेल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

मुलगा रस्ते अपघातात जखमी
घरात दुर्घटना झाल्याचे समजताच मीना सोनावणे यांचा मुलगा दुचाकीवरून घरी परतत होता. मात्र दुर्दैवाने काळाने वाटेतच घाला घातला. या अपघातात यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!