WWE Championship

WWE Championship : भारतात ‘या’ दिवशी रंगणार WWE चा रणसंग्राम!

706 0

मुंबई : भारतीय डब्लूडब्लूई (WWE Championship) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE Championship) स्पर्धा लवकरच भारतात होणार आहे. वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने या संदर्भात घोषणा केली आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात डब्लूडब्लूईचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच भारतीय चाहत्यांना लाईव्ह डब्लूडब्लूई फाईट पाहता येणार आहे.

कुठे पार पडणार डब्लूडब्लूईचा लाईव्ह थरार?
पहिल्यांदाच हैदराबादमध्ये डब्लूडब्लूई लाईव्ह फाईटचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटने दिली आहे. आपल्याला 8 सप्टेंबर रोजी डब्लूडब्लूई लाईव्ह सामने पाहायला मिळणार आहेत. GMC बालयोगी इनडोअर स्टेडियम (GMC Balayogi Indoor Stadium) म्हणजेच गचीबोवली इनडोअर स्टेडियम (Gachibowli Indoor Stadium) मध्ये डब्लूडब्लूई लाईव्ह मॅच रंगणार आहे. 4 ऑगस्टपासून या सामन्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!