आपला महाराष्ट्रक्राईमव्हिडिओ

Nashik News : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी भरपावसात काढली धिंड

नाशिक : मागच्या काही दिवसांपासून नाशिक रोड (Nashik News) परिसरात गुंडांनी धुमाकूळ घातला होता. यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत गुंडाना चांगलीच अद्दल घडवली आहे. मागील दोन दिवसापासून नाशिकरोड परिसरात (Nashik News) दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या गुंडांकडून करण्यात येत होता.

या गुंडांची भर पावसात चांगली धिंड काढण्यात आली आहे. जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांची नाशिकरोड परिसरातून जाहीर धिंड काढण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली गुन्हेगारांची भीती घालवण्यासाठी पोलिसांनी ही धिंड काढली.

Chhatrapati Sambhajinagar : शेतीच्या वादातून काकाने पुतण्यावर तलवारीने केले सपासप वार

काय होते प्रकरण?
सोमवारी आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस विहितगाव आणि धोंगडे मळा या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांची जाळपोळ करून गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली होती. यानंतर नाशिक पोलिसांनी (Nashik News) घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींच्या वेळीच मुस्क्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या गुंडाना अटक करत नाशिकरोड परिसरातील धोंगडे नगर, राजलक्ष्मी मंगल कार्यालय, विहितगाव, देवळाली गाव या भागातून धिंड काढली.