shirish kanekar

Shirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

553 0

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे आज निधन झालं आहे. ते 80 वर्षांचे होते. आज सकाळी अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.

शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर यांची ओळख होती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तर ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत. या घटनेमुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Share This News
error: Content is protected !!