Jayant Sawarkar

Jayant Savarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन

859 0

मुंबई : मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये काम केले आहे. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती.

जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला होता. त्यांनी आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी 1954 पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या 73व्या वर्षांपर्यंत त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरूच राहिली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी 100 हून अधिक नाटकात काम करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

Share This News
error: Content is protected !!