Manipur Crime

Manipur Crime : मणिपूर घटनेमधील मुख्य आरोपीच्या घराला अज्ञाताने लावली आग

548 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मणिपूरमध्ये (Manipur Crime) दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. एवढेच नाहीतर या प्रकरणातील एक संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जमाव महिलांना विवस्त्र करून रस्त्याने घेऊन जाताना आणि नंतर एका शेतात घेऊन जाताना दिसला. यात जमावातील काही लोक पीडितेच्या शरीराला ओरबाडत विटंबना करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण देशातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sangli News : वडिलांना घरी थांबवून मोटर पाण्यात ठेवायाला गेला अन्.., 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

मणिपूरमध्ये (Manipur Crime) 3 मे रोजी जातीय तणाव निर्माण होऊन हिंसाचार झाला. यानंतर एका जमावाने पीडित महिलांना विवस्त्र करत त्यांच्यावर अत्याचार केले. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्य व केंद्र सरकार खडबडून जागे झाले. आतापर्यंत या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडितेंवर अत्याचार करणाऱ्या व्हिडीओतील मुख्य आरोपीचं घर अज्ञातांकडून जाळण्यात आले आहे.

Ashish Sakharkar Passes Away : मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन; त्याची ‘ती’ शेवटची पोस्ट होतेय व्हायरल

मणिपूरमध्ये (Manipur Crime) महिलांची विवस्त्र धिंड काढून अत्याचाराचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर मणिपूर आणि दिल्लीत हिंसाचारावर अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या. मात्र, तरीही गुन्हा दाखल होऊन 62 दिवस हे प्रकरण अडगळीत पडल्याचे समोर आले. आता प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणावरून विरोधक सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!