Love Story

Seema Haider News : सीमा हैदरच्या ‘त्या’ दाव्याने प्रकरणात आला मोठा ट्विस्ट

794 0

नोएडा : सध्या सोशल मीडियावर सचिन मीणा आणि पाकिस्तानी महिला सीमा हैदर (Seema Haider News) यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. आपले प्रेम असलेल्या सचिनला भेटण्यासाठी सीमा अवैध पद्धतीनं नेपाळ मार्गे भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यामध्ये आता रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सध्या सीमाने (Seema Haider News) नुकत्याच केलेल्या एका खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. सचिन हा मला भेटण्यासाठी पाकिस्तानला येणार होता, मात्र मीच त्याला पाकिस्तानमध्ये येण्यास मज्जाव केला असा दावा सीमा हैदरने केला आहे.

Seema Haider : ‘सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाहीतर…’ मुंबई पोलिसांना धमकी

काय म्हणले सीमा हैदर?
सचिन मला भेटण्यासाठी पाकिस्तानला येणार होता, मात्र आपणच त्याला पाकिस्तानला येऊ नको असं सांगितलं. कारण त्याच्या हातावर ओमचं चिन्ह गोंदवलेलं होतं. जर सचिन तिथे पकडला गेला असता तर त्याच्यासोबत काय झालं असतं याची कल्पनाही करता येत नाही, असा दावा सीमाने केला आहे. तिच्या या दाव्याला सचिनने देखील दुजोरा दिला आहे.

Love Story : एक सीमा अशीही! पब्जीमुळे पाकिस्तानी सीमा आणि नोएडाचा सचिन यांची अनोखी प्रेमकहाणी

सचिनला पोलिसांकडून अटक
भारतामध्ये अवैधपद्धतीनं राहात असल्याच्या आरोपाखाली सीमाला आणि तिला आश्रय दिला म्हणून सचिनला गौतमबुद्ध नगर पोलिसांनी 3 जुलै रोजी अटक केली होती. त्यांना न्यायालयानं 7 जुलै रोजी जामीन मंजूर केला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सीमा म्हणाली (Seema Haider News) सचिन हेच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतातच राहील.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!