Nashik News

Nashik News : नाशिकमध्ये दोन गटांत तुफान राडा; Video आला समोर

775 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा (Nashik News) झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण हाणामारीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील महाकाली चौकामध्ये हि घटना घडली आहे. यावेळी टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

Jalna Murder : धक्कादायक! चर्चेला बोलावलं अन् घात केला; जालन्यात वंचितच्या जिल्हा महासचिवांची हत्या

काय आहे नेमके प्रकरण?
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी (Nashik News) झाली. ही सर्व घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. टोळक्याकडून वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी योग्य ती पाऊले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Shahid Afridi : वर्ल्ड कपआधी आफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला…

अहमदनगरमध्येही राडा
अहमदनगरमध्येदेखील अशीच हाणामारीची घटना घडली होती. शहरात दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यामध्ये राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला. यावेळी घटनास्थळी दगडफेकदेखील करण्यात आली. अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकामध्ये ही घटना घडली होती. अंकुश चत्तर असे या दगडफेकीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Share This News
error: Content is protected !!