AMruta Fadanvis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचे साप, घोरपड हातात घेऊन अनोखे फोटोशूट; सगळ्यांचं वेधलं लक्ष

1268 0

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कधी आपल्या गाण्यामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. पण सध्या त्या (Amruta Fadnavis) त्यांच्या अनोख्या फोटोशूटमुळे चर्चेत आल्या आहेत. हॅशटॅग फ्रायडे वाइब्स आणि फ्रायडे फिलिंग लिहित अमृता फडणवीस यांनी “सर्वात धोकादायक, विषारी आणि क्रूर प्राणी हा फक्त माणूस आहे,” असं कॅप्शन लिहत त्यांनी आपल्या अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

Ravindra Mahajani : हवापालटास आले अन् प्राण गमावले; रवींद्र महाजनींसोबत नेमकं काय घडलं?

Asian Games 2023: आशियाई खेळांसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ यंगस्टारकडे देण्यात आली कर्णधारपदाची धुरा

त्यांनी (Amruta Fadnavis) शेअर केलेल्या दोन फोटोंनी जास्त लक्ष वेधले आहे. त्यांनी एका फोटोमध्ये हातावर घोरपड घेतलेली दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी दोन्ही हातात साप पकडल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पिंक रेड रंगाचा ड्रेसनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या ड्रेसवर रेड टी शर्ट आणि रेड ब्लेझर परिधान केले आहे. या सुंदर ड्रेसमध्ये त्या खूपच खूपच सुंदर दिसत आहेत. अमृता फडणवीसांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टला अवघ्या काही तासांत काही हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!