Ravindra Mahajani

Ravindra Mahajani : हवापालटास आले अन् प्राण गमावले; रवींद्र महाजनींसोबत नेमकं काय घडलं?

2521 0

पुणे : आज सकाळच्या सुमारास मोठा पडदा गाजवलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन (Ravindra Mahajani) झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने मराठी सिनेसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी संध्याकाळी महाजनी (Ravindra Mahajani) राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. मावळ तालुक्यातील आंबी भागात असलेल्या संबंधित इमारतीच्या फ्लॅट नंबर 311 मध्ये महाजनी हे भाड्याने राहत होते. शुक्रवार सकाळपासून त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि ही घटना उघडकीस आली. वयाच्या 77 व्या वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला.

काय घडले नेमके?
सकाळपासून त्यांच्या खोलीतून विचित्र वास येत होता. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं, बाहेरुन वास येत असेल असं वाटलं, मात्र दुपारी 12 वाजल्यानंतर हा वास मोठ्या प्रमाणात वाढला. यानंतर लोकांनी मागोवा घेत तिसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातील घराकडे पाहिलं, तर तिथून दुर्गंधी सुटल्याचं लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती सिक्युरिटीला दिली. यानंतर सिक्युरिटीने याची कल्पना पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रूमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

तेव्हा रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) घरात जमिनीवर पडलेले होते. आंघोळीनंतर कपडे बदलत असताना तोल जाऊन ते पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह तळेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.

कोण होते रवींद्र महाजनी?
रवींद्र महाजनी यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठा काळ गाजवला आहे. त्यांना मराठी मनोरंजन विश्वातील विनोद खन्ना असे म्हंटले जायचे. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या महाजनींनी एकेकाळी फसवणूक, कर्जाचा डोंगर अशा अनेक संकटांचा सामना केला होता.

Share This News
error: Content is protected !!