Breaking News

झुंड चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

589 0

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताचं प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. सर्व स्तरातून या चित्रपटाचे कौतुक करण्यात येत आहे.

अनेक कलाकार झुंड चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसून येत आहेत अशीच एक पोस्ट अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नागराज मंजुळें सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

नेमकी काय आहे सिद्धार्थ जाधव यांची इन्स्टाग्राम पोस्ट

“तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही…नागराज मंजुळे भावा… अप्रतिम हा शब्द फक्त नावाला आहे.. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर “झुंड” पाहायलाच हवा…स्वप्न प्रत्येकाची असतात.. पण ती पूर्ण करण्याची धमक ‘झुंड’मध्ये होती, आहे आणि कायम राहणार.. हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलस… अभिमान वाटतो तुझा… “अपून की बस्ती गटर मे है… पर तुम्हारे मन मे गंद है”….या ओळी मनातून जातच नाहीत… अजय अतुल दादा… माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायमच राहिल. कलाकारांच्या कामाबद्दल मी काय बोलणार…”

“”बच्चों से लेकर बच्चन तक”…. सगळेच वरचा क्लास…जे जगणं आहे तेच नागराजने खरंखरं मांडलय….माणसाच्या माणुसकीचा प्रवास… झुंड… नक्की बघा नाही.. पहायलाच हवा..”, अशी पोस्ट सिद्धार्थ जाधवने केली आहे. सध्या सिद्धार्थची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.”

https://www.instagram.com/p/Caq1YQesuQ4/?utm_source=ig_web_copy_link

Share This News
error: Content is protected !!