Jalgaon Crime

Jalgaon Crime : दुकानावर जाताना काळाचा घाला; बापाचे छत्र हरपल्याने पोरं झाली पोरकी

574 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जळगाव (Jalgaon Crime) शहरातील आकाशवाणी चौकात उड्डाणपुलाजनजीक महामार्गावर ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही अपघाताची मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे. स्वप्निल सुरेश जोशी (वय-35, रा. देवीदास कॉलनी,) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या भीषण अपघातानंतर आरोपी डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

Delhi Crime : दिल्ली पुन्हा हादरली! उड्डाणपुलाजवळ आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे

जळगाव शहरातील (Jalgaon Crime) देवीदास कॉलनी परिसरात स्वप्निल जोशी हा तरूण आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. प्रेम नगरमध्ये त्याचे किराणामालाचे दुकान होते. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्वप्निल जोशी हा त्याच्या एमएच 19 बीएस 413 या दुचाकी ने इच्छादेवी चौकाकाडून काम आटोपून प्रेमनगरातील त्याच्या किराणादुकानाकडे जात होता.

Acid Attack : लग्न मोडल्यामुळे संतप्त होऊन आरोपीचे झोपलेल्या तरुणीसोबत ‘हे’ संतापजनक कृत्य

यादरम्यान आकाशवाणी चौकातून जात असताना गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाण पुलानजीक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच 19 सीवाय 5788 या क्रमाकांच्या डंपरने ओव्हरटेक करत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी डंपर चालक हा डंपर सोडून पसार झाला. या घटनेमुळे दोन चिमुरड्यांच्या डोक्यावरून त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!