Nagpur Crime News

Nagpur Crime News : धक्कादायक ! वडिलांच्या वाढदिवशीच लेकाचा दुर्दैवी अंत

1146 0

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Crime News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nagpur Crime News) एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे वडिलांच्या वाढदिवसादिवशीच पोटच्या लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि अपघाताची घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणी या ठिकाणी घडली आहे. अथर्व सूरज हिवराळे (वय 7) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

काय घडले नेमके?
शनिवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास अथर्व हा मित्रांसह घरासमोर खेळत (Nagpur Crime News) होता. यादरम्यान अचानक (MH-40-CL-8640) या मोटारसायकलने त्याला जोरदार धडक दिली. सुमारे 20 फुटांपर्यंत अथर्वला फरफटत नेल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. शेजाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या अगोदरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune Accident : कोळशाच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे पुण्यात भीषण अपघात

या अपघातामुळे (Nagpur Crime News) हिवराळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून चालक भूषण चांभारे याला अटक केली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात अथर्वच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!