सांगली : सांगलीकर (Sangli News) आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकाणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. यामध्ये (Sangli News) राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट तयार झाले. यावेळी शरद पवार यांना आपले समर्थन देण्यासाठी एका शेतकऱ्याने बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर ‘आम्ही साहेबांच्या सोबत’ची कलाकृती साकारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विविध ठिकाणाहून लोक शरद पवार यांना पाठिंबा देत असून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
Ajit Pawar : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वाळवा तालुक्यातील तांबवे गावच्या बैलप्रेमींनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलांच्या अंगावर रंगरगोटीद्वारे आम्ही साहेबांच्या सोबत आहोत असे लिहिले आहे. या बैलाची आणि त्याच्यावरील मजकुराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगताना दिसत आहे. वाळवा तालुक्यातील (Sangli News) आनंदराव गावडे यांनी काल (3 जुलै) बेंदुर सणाच्या निमित्तानं त्यांच्या कँप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर आम्ही साहेबांच्यासोबत अशी कलाकृती केली आहे. एका साईडला विठ्ठल आणि दुसऱ्या साईडला शरद पवार यांची छबी रेखाटली आहे. त्यावर आम्ही साहेबांच्या सोबत असे लिहिले आहे.
Road Accident : धक्कादायक! ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी (2 जुलै) राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनीदेखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे.