बुलढाणा : राज्यात अपघातांचे (Road Accident) प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. आज राज्यात दोन भयंकर अपघात घडले आहेत. एका अपघातात (Road Accident) ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरीकडे ट्रक आणि ट्रकच्या धडकेत बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Prithvi Shaw : पृथ्वी शॉचा मोठा निर्णय ! ‘या’ संघाकडून खेळणार क्रिकेट
काय घडले नेमके?
पहिल्या दुर्घटनेत पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात जानेफळ – लोणी गवळी मार्गावर घडली आहे. देविदास पवार आणि इंदुबाई पवार असे या अपघातात मृत पावलेल्या दांपत्याचे नाव आहे. आपल्या नातेवाईकांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला झाला आहे.
तर दुसऱ्या दुर्घटनेत चाकूर तालुक्यातील (Road Accident) आंबुलगा येथील अवधूत आणि अनुसया रक्ताटे या दोन बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोघे बहिण भाऊ लातूर येथून कॉलेजला प्रवेश घेऊन गावाकडे दुचाकी वरून परतत असताना आष्टामोड जवळ ट्रक सोबत झालेल्या अपघातात या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात शोक कळा पसरली आहे.