Praful Patel

Praful Patel : वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती मात्र… प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

401 0

मुंबई : रविवारी अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी केली. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी भाजपसोबत युती करणार होती. राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी शरद पवार यांना पत्र दिलं होतं असा खळबळजनक दावा पटेल यांनी केला आहे.

नेमके काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत वर्षभरापूर्वीच युती करणार होती. भाजपसोबत युती करण्यासाठी 51 आमदारांनी शरद पवार यांना पत्र दिलं होतं. एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना हे पत्र देण्यात आलं होते असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

Ajit Pawar : अजित पवारांचं समर्थन भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यावर राष्ट्रवादीकडून कारवाई

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीकडून कारवाई करण्यात येत आहे. नागपूर ग्रामीणचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!