Pravin Darekar

Praveen Darekar : वसंतदादांच्या वेळी लोकशाही वेगळी होती का ? प्रवीण दरेकरांचा शरद पवारांना सवाल

905 0

मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यानंतर सरकारमध्ये सहभागी होत, थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपने शिवसेनेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा मोठा गट फोडल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राज्यात कित्येक दिवसांपासून राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कालच्या घटनेने ती अखेर खरी ठरली. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्याच्या राजकारणात तिसऱ्यांदा भूकंप झाला आहे.

प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांनी नेहमी सोयीचे राजकारण केलं आहे वसंतदादा पाटील यांच्या सरकारच्या वेळेला लोकशाही वेगळी होती का? असा सवाल त्यांनी केला.

Poster : राज आणि उद्धव एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजितदादांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या इतर नऊ मंत्र्यांनी सुध्दा शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांना मोठा धक्का बसला आहे.त्यानंतर भाजपवर विरोधीपक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. या टीकेला उत्तर देतांना प्रवीण दरेकर म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना “हिंदुत्व शिकायची गरज आहे,त्यामुळे त्यांनी हिंदुत्वावर बोलू नये. संजय राऊत ज्योतिषी आहेत का ? हवेत गोळीबार करून संभ्रम निर्माण करण्याची त्यांची सवय आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide