Satara Accident

Satara Accident : साताऱ्यामध्ये देखील खासगी बसचा भीषण अपघात; 1 ठार तर 4 जण जखमी

1007 0

सातारा : आज पहाटेच्या सुमारास साताऱ्यामध्येदेखील (Satara Accident) खासगी बसचा भीषण अपघात (Satara Accident) झाला. पुणे- बंगळुरु आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळजवळील ट्यूब कंपनीजवळ हा भीषण अपघात झाला. समोर चालणाऱ्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर ड्रायव्हरसह 4 जण जखमी झाले आहेत. सुरज भीमराव शेवाळे (वय 27, रा. टाळगाव शेवाळेवाडी, कराड) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

Buldhana Bus Accident: ‘समृद्धी’वरील अपघात प्रकरणी आली मोठी अपडेट; बसचालकाविरोधात ‘या’ कलमांतर्गत दाखल केला गुन्हा

काय घडले नेमके?
पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या कंटेनरला (एनएल 01 जी 4069) शिरवळजवळील ट्यूब कंपनीजवळ ट्रॅव्हल्सने (एमएच 01 डीआर 0108) पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात ट्रॅव्हलच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरज भीमराव शेवाळे (वय 27, रा. टाळगाव शेवाळेवाडी, कराड ) या तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला तर राजश्री अनिल मोरे (वय 29, मु.पो. कराड, शंकर आनंदा बागडे (वय 45, मु. पो. शिराळा). अमित महादेव पवार (वय 29, मु.पो. किंद्रेवाडी), अंकुश पाटील (वय 48, मु. पनुंबरे, जि. सांगली) हे लोक जखमी झाले आहेत.

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत व्यक्तींची नावे आली समोर

या अपघाताची (Satara Accident) माहिती मिळताच शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगावडे व शिरवळ रेस्क्यू टिमचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने या अपघातातील जखमींना शिरवळ येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!