बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ (Buldhana Bus Accident) आज सकाळी बसचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी द्रुतगती मार्गावर (Buldhana Bus Accident) हा भीषण अपघात झाला. ही बस नागपुरहून पुण्याला जात होती. या अपघातात बसमधील एकूण 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत.या भीषण अपघातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत व्यक्तींची नावे आली समोर
दुखापतग्रस्त प्रवाशांमधील 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मेहकर रुग्णालयात 1 आणि सिंदखेडराजा रुग्णालयात 2 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज देण्यात आलेले सर्व प्रवासी संभाजीनगरचे होते. या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार आहे.
चालकाविरोधात गुन्हा दाखल
शेख दानीश शेख इसराईल असे बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी (Buldhana Bus Accident) सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 279, 304, 337 व 427 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.