Hanuman

Hanuman : ‘आदिपुरुष’नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘हनुमान’; ‘या’ दिवशी होणार रिलीज

921 0

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या ‘हनुमान’ (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक सध्या समोर आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. तेजा सज्जा स्टारर ‘हनुमान’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांनी सांभाळली आहे.

कधी होणार रिलीज?
12 जानेवारी 2024 रोजी ‘हनुमान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘हनुमान’ सिनेमाच्या व्हीएफएक्सचं काम अजून बाकी आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

11 भाषांमध्ये प्रदर्शित होणार ‘हनुमान’
तेजा सज्जासह ‘हनुमान’ या सिनेमात मृता अय्यर, वरलक्ष्मी सार्थकुमार, विनय राय आणि वेनेला किशोर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. जवळपास 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रत्येक भाषेत डबिंग व्हायलाही बराच वेळ लागेल. त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. तेलुगू, हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, स्पॅनिश, कोरियन, चिनी आणि जपानी अशा 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!