Gondia News

Gondia News : गोंदिया हादरलं! विद्युत मोटर विहिरीत सोडताना शॉक लागून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

598 0

गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Gondia News) विहिरीमध्ये पाण्याची मोटर टाकत असताना शॉक लागून 4 जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिरोडा तालुक्यातील सरांडी गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. सचिन गिरधारी साठवणे, सचिन भोंगाळे, प्रकाश भोंगाळे आणि महेंद्र राऊत अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. एकाच वेळी गावातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

काय घडले नेमके?
सचिन गिरधारी साठवणे हे आपल्या विहीरीत विद्युत मोटर टाकत होते. त्यावेळी त्यांना शॉक लागला आणि ते विहिरीत कोसळले. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेले सचिन भोंगाळे आणि प्रकाश भोंगाळे या काका पुतण्याचा देखील विहीरीत पडून मृत्यू झाला. यादरम्यान या सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारीच असलेल्या महेंद्र राऊत यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि ते या तिघांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले मात्र त्यानाही विजेचा धक्का लागला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Buldhana News : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

संपूर्ण गावावर शोककळा
एकाच गावातील चार जणांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या विहीरीमध्ये गॅस आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!