bomb-threat

Mumbai Blast Threat Call: मुंबई, पुण्याला उडवण्याची धमकी देणाऱ्या कॉलचे यूपी कनेक्शन समोर

533 0

मुंबई : आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला सकाळी एक धमकीचा (Mumbai Blast Threat Call) फोन आला. यामध्ये कॉल करणाऱ्याने मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकी (Mumbai Blast Threat Call) दिली आहे. या फोननंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. यानंतर त्यांनी तातडीने पाऊले उचलत हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला याचा तपास करण्यात येत आहे.

Rahul Kalate : राहुल कलाटे यांनी घेतली उदय सामंत यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

धमकी देणारा नक्की काय म्हणाला?
‘कॉल करणाऱ्याने गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोलला कॉल केला आणि दावा केला की 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला या परिसरात बॉम्बस्फोट होणार आहेत. एवढेच नाही तर कॉलरने पुढे असा देखील दावा केला आहे की, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो.’ तसेच तो पुढे म्हणाले फक्त मुंबईच नाहीतर ‘पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणणार आहे. या कामासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. जर दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावादेखील कॉल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.

Pune Crime : पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

यूपी कनेक्शन समोर
या कॉलनंतर पोलिसांनी तपास केला असता हा कॉल उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून आल्याचे समोर आले. अंबोली पोलिसांनी यासंदर्भात आयपीसीच्या कलम 505 (1)(बी), 505(2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!