Farmer

Farmer : शेतकऱ्यांसाठी पुढील 8 दिवस चिंताजनक; कृषी आयुक्तांनी दिली ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

426 0

मुंबई : पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांसाठी (Farmer) पुढील 8 दिवस खूप चिंताजनक असणार आहेत. येत्या आठ दिवसांत मान्सून सक्रीय होण्याची नितांत गरज असल्याचे केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी दिली आहे. अद्याप तरी शेतीवर (Farmer) मोठा परिणाम झालेला नाही. मागील दहा वर्षांचा विचार केल्यास, अशाप्रकारे तीन-चार वर्षे तरी मान्सूनने जूनमध्ये दगा दिल्याचे दिसले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

पण त्या प्रत्येक वर्षी जूनच्या अखेरच्या आठवड्यात व त्यानंतर जुलैमध्ये महिनाभर चांगला पाऊस बरसला आहे. त्यामुळेच शेती व पेरण्यांचा विचार केल्यास, पुढील आठ दिवस खूप महत्वाचे असणार आहेत. तसेच केंद्रीय कृषी विभाग हवामान खात्याच्या समन्वयातून स्थितीवर लक्ष ठेऊन आहे’ असेदेखील ते म्हणाले. चक्रीवादळाच्या निमित्ताने गुजरात, राजस्थानात दमदार पाऊस पडला आहे. राजस्थानात मे महिन्यातदेखील पाऊस झाला.

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! थेट ‘थार’ ला नांगर जोडून केली नांगरणी

ईशान्य व पूर्व भारतात पाऊस पडलेला नाही. चक्रीवादळाचा फायदा गुजरातला मिळाल्याने केवळ गुजरातमध्ये आत्तापर्यंत तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मात्र ही तूट तब्बल 88 टक्क्यांवर गेली आहे. राज्यात 11 जूनला पावसाचे आगमन झाल्यानंतर कोकणामध्ये काही शेतकऱ्यांनी (Farmer) भाताची रोवणीही केली. मात्र गेल्या नऊ दिवसांपासून पावसाचा प्रवास रखडला आहे. त्यातच तापमानवाढीमुळे रोवणी केलेली पिके करपली आहेत.

Share This News
error: Content is protected !!